यक्षप्रश्न
आनंदने टॉयची गाठ नीट केली. आरशात कोटाच्या कॉलर नीट आहेत का नाही ते पुन्हा एकदा न्याहाळून पाहिले. त्याला आरशात स्वतःची प्रतिमा पाहून आपण आपल्या आयुष्यातील अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचलो याचा अभिमान वाटत होता. थोड्याच वेळात तो बाहेर पडला. शोफर कारचा दरवाजा उघडून वाट पाहत होता. आज जयंतीभाईंनी सकाळी सकाळी कॉल केला होता. नवीन टेंडर दाखल करायचे होते. कोणत्याही परिस्थितीत हे मशीन पार्ट बनवायचे कॉन्ट्रॅक्ट हातून जाऊन द्यायचे नव्हते. बाफना ची कंपनी स्पर्धेत होती, त्यांनी मध्येच काहीतरी गडबड करून कॉन्ट्रॅक्ट मिळवू नये म्हणून तो लक्ष ठेवून होता. ज्याच्या मनात गरुडाच्या पंखाचे बळ आहे तो कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत उंच भरारी मारु शकतो हे आनंदाने आपल्या स्वकर्तृत्वानं सिद्ध केले होते. तो आज जयंतीलाल यांच्या अग्रवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये सिनियर मॅनेजर...